क्रेडिट युटीलायझेशन रेशो: ते कसे कार्य करते आणि त्यात सुधारणा कशी करावी

CRIF Credit Utilization Ratio

क्रेडिट युटीलायझेशन रेशो हे आपल्या क्रेडीट स्कोअरचे निर्धारण करण्यातील एक प्रमुख घटकांपैकी एक आहे, म्हणून ते कसे कार्य करते हे समजून घेणे महत्वाचे आहे. खरे तर, चांगला क्रेडिट स्कोअर आपल्याला उच्च कर्जाच्या रकमेसाठी आणि कमी व्याज दरासाठी पात्र बनवू शकतो त्याचप्रमाणे कमी क्रेडिट स्कोअर आपल्याला आर्थिक उद्दिष्टे गाठणे कठिण करू शकतो. या ब्लॉगमध्ये, आम्ही क्रेडिट युटीलायझेशनबद्दल आपल्याला माहित असलेल्या सर्व गोष्टीचा समावेश करण्याचा प्रयत्न करू, जसे की:

  • क्रेडिट युटीलायझेशन रेशो किती आहे?
  • क्रेडिट युटीलायझेशन रेशोची गणना कशी केली जाते?
  • चांगला क्रेडिट युटीलायझेशन रेशो काय असतो?
  • क्रेडिट युटीलायझेशन रेशो कसा सुधारित करावा

क्रेडिट युटिलिटेशन रेशो म्हणजे काय, याने सुरूवात करूया?

आपल्या क्रेडिट युटिलिटी रेट, म्हणजेच कधीकधी ज्याला आपला क्रेडिट युटिलिटेशन रेशो म्हटले जाते तो म्हणजे, आपल्या क्रेडिट कार्ड आउटस्टॅडिंग चा आपल्या क्रेडिट लिमीटशी असणारा रेशो. वापरल्या जाणाऱ्या स्कोअरिंग मॉडेलवर अवलंबून असून, ते क्रेडिट स्कोअरवर 20-30% प्रभाव पाडू शकतात. आपण कधीही आपल्या क्रेडिट कार्डाचा वापर न केल्यास आणि त्यावर कोणतेही शिल्लक नसल्यास आपले क्रेडिट युटीलायझेशन शून्य असेल. आपण सामान्यत: एक किंवा अधिक कार्डवर शिल्लक ठेवत असाल, तर आपण आपल्या काही उपलब्ध क्रेडिट-कर्जाचा ‘वापर’ करत आहात आणि क्रेडिट ब्युरो हेच लक्षात घेतात. आपल्या क्रेडिट कार्डासाठी एकापेक्षा जास्त युटीलायझेशन रेट आपल्या क्रेडिट स्कोअरवर खरोखर प्रभाव पाडत नसल्यास, क्रेडिट युटीलायझेशन रेट सातत्याने अधिक असेल तर आपल्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल.

क्रेडिट युटीलायझेशन रेशो कसा मोजला जातो?

प्रत्येक क्रेडिट कार्डसाठी (कार्ड मर्यादेला कार्ड शिल्लकने भागून) आणि एकंदरित (सर्व कार्डावरील एकूण शिल्लक भागिले क्रेडिट मर्यादेची बेरीज) क्रेडिट युटीलायझेशन रेशो मोजले जाऊ शकतात.

उदाहरणार्थ:

 देय शिल्लकक्रेडिट लिमिटक्रेडिट युटीलायझेशन रेशो
कार्ड 1₹0₹50,0000%
कार्ड 2₹80,000₹100,00080%
कार्ड 3₹10,000₹75,00013.3%

एकून क्रेडिट कार्ड शिल्लक / एकून उपलब्ध क्रेडिट    =   क्रेडिट युटीलायझेशन रेशो

या केसमध्ये एकून क्रेडिट युटीलायझेशन रेशो 40% असेल.

चांगला क्रेडिट युटीलायलेशन रेशो काय असतो?

क्रेडिट युटीलायलेशनसाठी एक सामान्य नियम म्हणजे 30-40 टक्के दरम्यान तो ठेवणे हा आहे. हे प्रत्येक वैयक्तिक कार्डसाठी आणि आपल्या एकूण क्रेडिट युटीलायलेशन रेशोसाठी लागू होते. वरील नमूद केलेल्या टक्केवारीपेक्षा थोडा देखील जास्त क्रेडिट स्कोअर, आपल्या क्रेडिट स्कोअरला खाली खेचू शकतो कारण कर्जदार याला कर्जाच्या हव्यासाशी निगडीत करतो.

याचा अर्थ असा नाही की कोणत्याही कार्डवरील, क्रेडिट युटीलायलेशन कधीही  40% पार करू शकत नाही. मागील 6-12 महिन्यांमध्ये उच्च वापर असल्याचे दिसत असेल तर क्रेडिट स्कोअरवरील प्रभाव जास्त असतो.

अंतिमत:, या स्मार्ट हालचालींद्वारे आपला क्रेडिट युटीलायझेशन रेट आणि शेवटी क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा करा

  1. वारंवार क्रेडिट कार्ड भरणे – आपण वेगवेगळ्या व्यवहारांवर कार्ड फायदे मिळविण्यासाठी आपल्या क्रेडिट कार्डचा वापर करीत असताना, दर महिन्याला आपल्या क्रेडिट कार्डची देय रक्कम किमान पेक्षा अधिक ठेवण्यासाठी वारंवार पैसे भरण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, अगदी क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट मासिक आधारावर तयार होत असतानाही, आपण दर 10 दिवसांनी आपल्या क्रेडिट कार्डाचे पैसे भरू शकता. म्हणूनच आपले क्रेडिट लिमीट पुन्हा भरले जाईल आणि अशा प्रकारे आपला क्रेडिट युटीलायझेशन रेट कमी दिसेल.
  2. उच्च क्रेडिट मर्यादा मिळविणे – जर आपल्याला विश्वास वाटत असेल की आपण प्रभावीपणे क्रेडिट कार्ड देय आणि आपले नियमित खर्च यांच्या दरम्यान अदलाबदल करू शकतो, तर आपण आपल्या बँकेतून उच्च क्रेडिट लिमीटची मागणी करू शकता. सध्याच्या क्रेडिट कार्डचा वापर एकसमान असला तरीही, आपला क्रेडिट युटीलायझेशन रेशो आपोआप वाढेल, कारण वापरण्यायोग्य मर्यादा वाढलेली असेल. तथापि, अशा वेळी, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण उच्च क्रेडिट मर्यादा असल्यामुळे आपल्याला अधिक खर्च करावासा वाटेल.
  3. लिमिट्स व्यवस्थापित करण्यासाठी एकाधिक क्रेडिट कार्ड वापरणे – जर आपल्याकडे एकाधिक क्रेडिट कार्ड असतील तर, सर्व व्यवहारांसाठी प्राथमिक कार्ड वापरण्यापेक्षा, वेगवेगळ्या व्यवहारांसाठी वेगवेगळे क्रेडिट कार्ड वापरा. त्यानुसार, आपल्याकडे एकाच कार्डसाठी खूप जास्त युटीलायझेशन रेट आणि इतर कार्डसाठी खूप कमी / निल असण्यापेक्षा सर्व कार्डासाठी कमी युटीलायझेशन रेट असेल.
  4. पैसे दिल्यानंतर कार्ड ओपन सोडून द्या- कार्ड बंद करून, आपण आपली एकूण रक्कम कमी करत आहात. कार्ड सुरु ठेवून, आपण आपली एकूण क्रेडिट मर्यादा कायम ठेवत आहात-यामुळे आपले क्रेडिट युटीलायझेशन रेशो कमी ठेवू शकता.

आपण आपल्या क्रेडिट स्कोअरवर नियमितपणे देखरेख ठेवली पाहिजे आणि चांगल्या क्रेडिट सवयींच्या मदतीने चांगले क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी प्रयत्न करावे. आपण सीआरआयएफ येथे आपला क्रेडिट स्कोअर देखील तपासू शकता Check Your Credit Score Now

 

Facebooktwitterlinkedinmail
youtube